
दैनिक चालु वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात दुसरा टप्पा २७ डिसेंबरपासून पेनुर गटातून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य्य उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
दक्षिण सोलापूर अक्कलकोट या तालुक्यांमध्ये जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मोहोळ तालुक्यामध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान उमेश पाटील यांच्या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळत असून जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात येत असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान उमेश पाटील यांच्या या जनता दरबारामुळे राष्ट्रवादीतील दोन गट समोर आल्याचे चित्र दिसून येत आहे. उमेश पाटील आणि रमेश बारसकर हे तालुक्यात जनता दरबाराच्या निमित्ताने एकत्र आले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर प्रत्येक सभेमध्ये टीकास्त्र सोडले आहे. रमेश पाटील यांनीही पाटील यांच्यावर अनेक वेळा टीका-टप्पणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील दुफळी समोर आली आहे. मोहोळ तालुक्यामध्ये सुरू झालेल्या या जनता दरबारातील दुसऱ्या टप्प्यामध्ये सोमवारपासून पेनुर येथून या जनता दरबारातला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले प्रश्न याठिकाणी आपले प्रश्न मांडून सोडवून घ्यावेत, असे आवाहन उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.