
दैनिक चालू वार्ता
भूम प्रतिनीधी नवनाथ यादव
भूम:- सविस्तर वृत्त असे की भुम तालुक्यातील आष्टा शाळेभोवती पशुवैद्यकीय दवाखाना,शेतकरी यांनी केलेले अतिक्रमण हटवावे या मागणी साठी शाळेला टाळे ठोकत भूम- वारदवाडी राज्य महामार्गावर सुमारे एक ते दीड तास विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.
केंद्रीय प्राथमिक शाळा,विद्या मंदीर हायस्कूल या शाळे जवळ अतिक्रमण असल्यामुळे विद्यार्थांना शिक्षण घेण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे जोपर्यंत अतिक्रमण हटावमोहीम प्रशासन मागणी मान्य करत नाही तोपर्यंत शाळे बंद राहतील असा निर्धार पालकसह ग्रामस्थांनी घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.याकडे लोकप्रतिनिधी, प्रशासनाने लक्ष देवून तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.
*अतिक्रमण हटविण्यास टाळा टाळ..
* सर्वे नं.२४८,२४९ व २५० यांची मोजणी करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी पालक, विद्यार्थी, ग्रामस्थांची आहे.परंतू २४८ सर्वे नं.चे दोन नकाशे आहेत. या दोन नकाशे मुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
*सर्व्हे नं.२४९ ची मोजणी करून देण्यास भूमी अभिलेख विभाग ने नकार दर्शविली आहे.त्यामुळे शाळेलगतचे अतिक्रमण हटवण्यास असमर्थ असल्याचे गटविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.