
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
श्री.रमेश राठोड आर्णी
आर्णी-तालुक्यातील जि प उच्च प्राथमिक मराठी शाळा लोहकरवाडी येथे दि २०/१२/२०२१ ते २२/१२/२०२१ या कालावधीत निपून भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये गाणितीय परिपाठ ,गाणितीय रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, फलक लेखन, प्रश्नमंजुषा, गणित मेळावा, गणित जत्रा,गणिततज्ञ श्रीनिवास रामनुजन या विषयावर निबंध स्पर्धा ,गणित साहित्याची ओळख इत्यादी उपक्रम घेण्यात आले. आर्णी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर रावते , केंद्रप्रमुख तुकाराम चव्हाण व मुख्याध्यापक विष्णू पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुचीता बोहरे, प्रभावती पाटील , योगिनी प्रशांत वंजारे आणि विद्यार्थ्यांनी गणितोत्सवाचे यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. यावर्षीच्या गणितोत्सवा ची प्रमुख संकल्पना ‘पायाभूत संख्या ज्ञान’ ही निश्चित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने विद्यार्थी, शाळा, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचा सक्रिय व उत्स्फूर्त सहभाग घेण्यात आला