
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी:-माधव गोटमवाड
लोहा – तालुक्यातील कुंभार समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, कुंभार समाजाचा पारंपारिक व्यवसायासाठी लागणार्या माती संदर्भात तहसीलदार यांच्याशी चर्चा करून रीतसर परवानगीची मागणी केली, लोहा तालुक्यात कुंभार समाजाच्या अनेक विटभट्या आहेत अद्यापपर्यंत कुठल्याही वीट भट्टी व्यवसायिकांना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे अनेक वीटभट्टी व्यवसायीकांना आडचनिचा सामना करावा लागत आहे.
कुंभार समाजाच्या पारंपारिक व्यवसायासाठी २०१० पासून ५०० ब्रास मातीवरील रॉयल्टीची सूट देण्यात आली आहे.
सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायिकांना खूप मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे, अनेक जाचक अटींचा भडीमार यांच्यावर करण्यात येत आहे, त्यामुळेच या विषयावर अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर २१/०१/२०१९ रोजी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडून शासन परिपत्रक /०८१८/प्र.क्र.१९५/ख परीत करन्यात आला.
वरील शासन परिपत्रकानुसार आपल्या तालुक्यातही पन्हाळा पॅटर्न राबवण्यात यावा याविषयी अनेक वेळा तहसिल कार्यालयात पाठपुरावा केला त्यानुसार लोहा तहसिल कार्यालयाकडून दिनांक २०/०८/२०१९ रोजी लोहा तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व संपुर्ण तलाठी यांच्या नावाने प्रत काढुन कुंभार समाजातील व्यवसायीकांची गाव निहाय यादी करावी, यादी तयार करत असताना जातीचे दाखले असलेल्या व्यक्तींची व जातीचे दाखले नसलेल्या व्यक्तींची स्वतंत्र यादी तयार करावी असे आदेश देण्यात आले होते, त्याचबरोबर इतर काही मुद्दे त्या पत्रात दीले होते.
या विषयावर श्रीराम तेलंग यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला, मंडळ अधिकाऱ्यांना याविषयी फोनवर विचारणा केली आसता काही अधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तरे दिली परंतु अद्याप कोणीही या पत्रावर काम केले नाही.
दरवर्षी कुंभार समाजातील वीट व्यवसायिकांना तहसील कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत आहेत, तहसील कार्यालयात अनेक वीटभट्टी व्यवसायिक यांचे अर्ज प्रलंबित आहेत, त्यावर कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. या संदर्भात शेवडी सर्कल चे मंडळ अधिकारी कटारे यांना विचारणा करण्यासाठी श्रीराम तेलंग यांनी फोन केला असता त्यांनी तुम्हाला वाहनाचा वापर न करता गाढवाने ५०० ब्रास माती वाहतूक करावी लागेल अशी तंबी दिली आणि जास्त बोलू नको ऑफिस वर येउन बोल अशी धमकी वजा सुचना केली होती.
या बदलत्या काळानुसार अनेक बदल होत गेले आणि अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने प्रत्येक जण आपल्या व्यवसायाची प्रगती करत गेला.
पूर्वीच्या काळात दळणवळणासाठी कुठलेही साहित्य उपलब्ध नव्हते म्हणून पूर्वी लोक गाढवा च्या साह्याने दळणवळण करीत असत, परंतु सध्या दळणवळणासाठी खूप मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर करण्यात येतो त्याच पद्धतीने वेळेनुसार व्यवसायातही बदल करावा लागतो म्हणून ५०० ब्रास माती ही वाहनानेच वाहतूक करावी लागते याची जाणीव सर्वांना आहे परंतु कुंभार समाजाला अजूनही पूर्वीच्या काळात आडकवुन ठेवण्याचा व कुंभार समाजाला त्यांच्या प्रगतीपासून रोखण्याचा विडा यांनी उचललेला दिसत आहे की काय आसा प्रश्न समाजाच्या वतीने उपस्थित करण्यात आला.
सदरील शेवडी सर्कलचे मंडळाधिकारी कटारे यांच्या या वक्तव्यामुळे समस्त कुंभार समाजाच्या भावना दुखावल्या असून कुंभार समाजाला अजूनही अत्याधुनिक यंत्रांचा वापर न करता गाढवाने वाहतूक करावी लागणार असेल तर अजून कुंभार समाज स्वतंत्र आहे की नाही असेही या निवेदनात म्हटले आहे
समस्त कुंभार समाजाच्या वतीने मंडळ अधिकारी कटारे यांचा जाहीर निषेध करत आहोत, संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून सर्वसामान्य जनतेला बोलण्याची शिस्त शिकवावी, त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील कुंभार समाजाचा सर्वे करून त्याचा अहवाल आपल्या कार्यालयाकडे सादर करण्याच्या सुचना आसतानाही आजपर्यंत कुठल्याही मंडळ अधिकारी व तलाठी यांनी अहवाल सादर केलेला नाही.
सोबत दिलेल्या पत्राचा विचार करून योग्य ती कारवाई करावी व मंडळ अधिकारी कटारे यांनी गाढवाने वाहतूक करावी लागेल अशी तंबी कुठल्या गोष्टीचा आधार घेऊन दीली आहे याचे स्पष्टीकरण देण्यात यावे, अन्यथा कुंभार समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल मंडळ अधिकारी कटारे यांच्या विरोधात महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करून निदर्शने करण्यात येतील व आपल्या कार्यालयावर येणाऱ्या काळात कुंभार समाजाचा गाढव मोर्चा तसेच मटके फोडो आंदोलन करण्यार आसल्याचे श्रीराम तेलंग यांनी निवेदनात म्हटले आहे, यावेळी उपस्थित बालाजी जोरूळे, शिवाजी टीमकीकर, तुळशीराम जोरूळे, राधाकृष्ण जोरूळे, बाबु देवडे, संभाजी टीमकीकर, चांदु टीमकीकर,, अंकुश जोरूळे, रामचंद्र परडे, लक्ष्मण परडे, संजय परडे, तुकाराम परडे, इश्वर परडे,गोविंद तेलंग, रमण तेलंग, संतोष जोरूळे, आनंद परडे, माधव बहणे, नंदराम बहणे, व्यंकटी बहणे, भागवत बहणे, रामेश्वर परडे, कोंडीबा परडे, आदी उपस्थित होते.