
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी वाडा
मनिषा भालेराव
वाडा (आज दि कामे २३/१२/२०२१) : रोजी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने वाडा नगरपंचायत मंजूर निविदा प्रक्रीयेप्रमाणे विकास कामे करण्यात यावीत अशी मागणी वाडा नगरपंचायत मध्ये करणेत आली! अनंता वनगा-आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना’
आपल्या वाडा नगरपंचायतीच्या माध्यमातून वाडा शहरात विविध विकास कामांची निविदा प्रक्रीया राबवली जात आहे,ही प्रक्रीया राबवित असताना कमी दराने निविदा भरणारया ठॆकेदारास काम मंजूर करण्याचे शासनाचे धोरण आहे त्यानुसार निविदा प्रक्रीया राबविण्यात यावी,निविदा मंजूर झाल्यावर काम लागलेला ठेकेदार एजन्सीला कोणत्याही प्रकारची माघार घेण्याची तरतूद नाही,मात्र बेकायदेशीरपणे संगतमत करुन काम करण्यास नकार देण्याच्या नावाखाली दुसरा अथवा तिसरा स्पर्धक एजन्सीला काम देण्याची शंका आहे,त्यामुळे शासनाच्या खुल्या निविदा प्रक्रीयेच्या धोरणाला हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे.
तरी आपणांस विनंती आहे की ही निविदा प्रक्रिया राबविताना शासनाच्या धोरणांचा अवलंब करूनच राबविण्यात यावी व कोणत्याही प्रकारची तडजोड अथवा माघार घेण्याची तरतूद ठेवू नये अशी मागणी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने वाडा नगरपंचायत मुख्याधिकारी यांना करणेत आली तसेच एक निवेदन मा अपर सचिव,नगरविकास विभाग महाराष्ट्र राज्य,मंत्रालय यांनाही देण्यात आले.
तसेच वाडा नगरपंचायत मधील अधिकारी घायवट यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा,काॅग्रेस सेवादलचे वाडा तालुका अध्यक्ष जगदीश केणे,सेवादल वाडा शहर अध्यक्ष संदीप कराळे व कार्यकर्ते उपस्थित होते!