
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- चांदूर रेल्वे तालुक्यात घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बोरी उपकेंद्र येथे वाई बोथ या गावात रहिवासी असलेल्या पर्वताबाई महादेवराव डवरे वय वर्षे १०२ असलेल्या आजीचा जन्म १९१९ मधला या आजीचे कोविड प्रतिबंधक लसीकरण घुईखेड पीएचसीच्या आरोग्य पथकाने केले.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रियांका निकोसे यांनी दिली.आरोग्य पथकात राजेश जुमडे,कुंदा वानखडे आदींचा समावेश होता.लसीकरण हे साथीपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असून ते सर्वांनी करून घ्यावे असा संदेश या आजींनी लोकांना दिला आहे.
कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी आरोग्य पथके पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरणाला गती देत आहेत. ज्येष्ठ, दिव्यांग व्यक्ती यांचे घरी पोहोचून लसीकरण करण्यात येत आहे.यापुढेही अशीच गती कायम ठेवून लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.