
दैनिक चालु वार्ता,
प्रतिनिधी,कोकणे उमाकांत
देगलूर-शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद वित्त विभाग शिक्षण विभाग शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत व शिक्षक सेनेच्या वतीने वारंवार निवेदन देऊनही प्रलंबित प्रश्न निकाली न काढल्यास बाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना देगलूर च्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा परिषद विभाग व शिक्षण विभाग व शिक्षकांचे प्रश्न पडलेले आहेत. व शिक्षक सेनेच्या वतीने वारंवार निवेदन देऊनही प्रश्न प्रलंबित आहेत. जीपीएफ वारंवार अर्ज देऊनही दुरुस्ती होत नाही शिक्षण विभागाकडून वेतनश्रेणी असो की पदोन्नत्या वेळेवर कोणतेही काम केले नाही .उलट शुन्य आकडे टाकून व्याजाच्या रकमेत तफावत करून शिक्षक बांधवांची गोची केली आहे. तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या निवड श्रेणीचा लाभ शिक्षक मानव सेवा निवृत्त होऊनही झालेला नाही. अशा या प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यासाठी जिल्हा परिषद नांदेड समोर न्याय मागण्यासाठी व हक्कासाठी धरणे आंदोलन दिनांक 21 जानेवारी दोन हजार बावीस रोजी न्याय हक्कासाठी तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला आहे. या निवेदनावर संतोष अंबुलगेकर ,रवी बंडेवार, गंगाधर कदम, विठ्ठल देशातवाड, किरण बिरादार, मनोहर बंडेवार ,बालाजी राजुरवार, अविनाश चिद्रावार, गंगाधर ढवळे, गोविंद सुवर्णकार ,संजय मोरे पुंडलिकराव कारामुंगे, शिवकुमार निलगिरवार ,हमीद मोमीन, बालाजी भांगे, विरभद्र बसापुरे, गोविंदा आलेट वाड, ज्योतीताई शिंदे, पंचफुला वाघमारे, सुकन्या खांडरे ,शोभा गिरी मॅडम, बालाजी पेटेकर ,आकाश राजुरे, सचिन रामदीनवार, संगम शशिकांत मठवाले , बाजगिरे बि.एम. शुभांगी व्ही .एन. डांगे एल .जी .यांचे या निवेदनावर स्वाक्षरी आहेत .