
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा -: सकाळी साडेसहाच्या सुमारास यवतमाळ आर्णी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याने लोहा कंधार तालुका परिसरातून हळ हळ व्यक्त होत आहे.
वर्धा येथून टिन पत्रा घेऊन ट्रक क्रमांक एम एच २८-बी ६८१४ नांदेड कडे घेऊन जात असताना वाटेत यवतमाळ आर्णी रोडवर ट्रकचा ताबा सुटून गाडी वाघाडी नदीच्या पुलावरून खाली कोसळली.ट्रक ड्रायव्हर ज्ञानेश्वर कोपनर (वय२४) रा. हुलेवाडी ता. लोहा जि.नांदेड या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश किडे (वय २२) रा.चिखलभोशी ता.कंधार जि.नांदेड हा ड्राइव्हर गंभीररित्या जखमी झाला.त्यास नागपूर येथे हलविण्यात आले. १२ तासाच्या अखंड उपचारानंतर देखील ड्रायव्हर उमेश किडे याला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले.
उमेश किडे हा आपल्या आई वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. तर ज्ञानेश्वर कोपनर याच्या पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. मागील सात महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. या दोन युवकांच्या अकाली जाण्याने लोहा कंधार परिसरात शोककळा पसरली.
एक दिवसाआड ग्रामस्थ नातेवाईकांच्या उपस्थितीत दोन्ही मृत्तांना रात्री उशिरा अग्नी देण्यात आला.पुढील तपास ठाणेदार मनोज कदारे करीत आहेत.