
दैनिक चालू वार्ता
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
*प्रदिप मडावी
माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी पुष्पहार अर्पण करून केले नमन
राजूरा :-देशाचे कणखर नेतृत्व माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे भाजपा जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले,यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार करून नमन केले,तसेच त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हणाले की स्व.अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे नव्हेतर संपुर्ण जागांचे नेते होते,देशात कोणताही पक्ष असो त्यांना आदर्श मानत होते,अटलबिहारी वाजपेयी यांचे नेतृत्व कणखर आणि प्रेनादायी होते अश्या नेताचा आज वाढदिवस त्यांच्या या जयंतीनिमित्त त्यांना राजुरा विधानसभा क्षेत्रातर्फे कोटी कोटी नमन करते असे ते म्हणाले
श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख,तालुका महामंत्री दिलीप वांढरे,तालुका महामंत्री प्रशांत घरोटे,नगरसेवक राजेंद्र डोहे,नगरसेविका उज्वला जयपूरकर,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजयुमो तालुका महासचिव रवि बुरडकर,ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी,भाजपचे नेते महादेव तपासे,गणेश रेकलवार,विलास खिरडकर,सुनील लेखराजनी,अनिल खणके,श्रीनिवास पांजा,जितेंद्र देशकर,प्रकाश आस्वले,वासुदेव झाडे,संदीप मडावी आदी उपस्थित होते.