
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी,
गोविंद पवार
पेनुर : – गेल्या आठ – दहा दिवसांपासून एरटेलचे नेटवर्क गायब झाल्याने पेनुर परीसरातील जनता ञस्त असुन या नेटवर्कमुळे अनेक ऑनलाईन कामे , बॅंकिंग कामे , टप्प झाल्याने जनता संतप्त झाल्याचे चित्र परीसरात पहावयास मिळत आहे. एरटेल कंपनीद्वारे ग्राहकांना मोबाईल इंटरनेट सुविधा , काॅलीग सुविधा , दिलेली असती आज आठ ते दहा दिवसांपासून एरटेलचे नेटवर्क गायब झाल्याने ग्राहकांची तारांबळ उडालेली दिसते , कंपनीने एरटेल टाॅवरवर एक कर्मचारी , डिझेलची व्यवस्था पण केलेली असती तरीपण एरटेलचे नेटवर्क गायब झाल्याने कंपनीच्या नावे परीसरातील नागरीक आक्रोश केलेले चिञ दिसुन येत आहे.
एरटेल कंपनीने त्वरीत नेटवर्क प्राब्लेम दुरूस्त करावा व ग्राहकांना तातडीने सुविधा चालु करावी अशी प्रतिक्रिया अनिकेत पा गवते यांनी दिली आहे.