
दै चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
नांदेड:- नांदेड जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक बैठक गुरुवारी (ता.२३) रोजी संपन्न झाली. याबैठकीत अनेक महत्वांच्या विषयावर चर्चा झाली. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या वयानुरूप कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार असून शाळांनी टीसी नसल्याचे कारण दाखवून तो प्रवेश नाकारू नये आणि विद्यार्थ्याला वंचित ठेवू नये जर तसे आढळल्यास संबंधित शाळांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. तसेच सर्व शाळा स्तरावर आर.टी.ई. नियमावलीचा बोर्ड लावावा,अशा सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिल्या आहेत.बैठकीला ज्येष्ठ सदस्य साहेबराव धनगे, सौ.संध्याताई धोंडगे,सौ.अनुराधाताई पाटील,सौ.ज्योत्स्नाताई नरवाडे,स्वीकृत सदस्य बसवराज पाटील,सदस्य संतोष देवराये यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीस माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, लेखाधिकारी योगेश परळीकर यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारीसह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.