
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ पिंपरी प्रतिनिधी
पुणे-: मंथन फाउंडेशन, सहेली कार्यकर्ता संघ व रिलीफ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मुलांनी आपली ओळख करून दिली व आपले कला गुणदर्शन सादर केले. तसेच मंथन फाउंडेशन तर्फे मुलांना डाबर च्यवनप्राश वाटप करण्यात आले. पुढेही मुलांसाठी विविध कार्यक्रम घेण्याचे संस्थांनी ठरवले आहे. सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी सूत्रसंचालन मंदाकिनी देसले यांनी केले.
मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट यांनी मंथन फाउंडेशन च्या कामाबद्दल माहिती दिली, मुलांसोबत कसे काम चालते, याबद्दल माहिती दिली. यावेळी उपस्थित रिलीफ फाऊंडेशनच्या भाग्यश्री मुथा, सहेली संघच्या संचालक तेजस्वी सेवेकरी, महादेवी ताई , शामा ताई, मीना ताई , मालन ताई व सर्व बाल चमू व त्यांचे पालक उपस्थित होते. आभार प्रदर्शन मारुती यांनी केले.