
दैनिक चालु वर्धा
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादराव लोखंडे
नांदेड:- दि.25 डिसेंबर श्री निकेतन हायस्कूल मध्ये भारताचे माजी पंतप्रधान मा.श्री.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिन सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला.प्रारंभी संस्थेच्या सहसचिव तथा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन.राऊत मॉडम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मा.वाय.एल.थोरात सर उपस्थित होते.
डॉ. सौ.एस.एन.राऊत मॉडम यांनी सुशासन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.