
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार-: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नवापूर तालुक्याच्या वतीने सर्व ओबीसी समाजाचे अध्यक्ष व नवापूर मधील युवकांनी तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार सुरेखा जगताप यांना नुकतेच निवेदन दिले या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील 27 टक्के आरक्षण स्थगित करण्याबाबत दिलेल्या निर्णयामुळे केवळ महाराष्ट्र राज्यातच नाही तर देशभरातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाने आता हा डेटा गोळा करायचा असून त्यासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आली आहे परंतु याच कालावधीत राज्यातील अनेक जिल्हा परिषद नगरपालिका व महानगरपालिका च्या निवडणुका होणार आहे निवडणूक आरक्षण पूर्ववत होण्याच्या अगोदर घेतल्या गेल्या तर राज्यभरातील ओबीसींच्या हक्कांवर त्या यामुळे गदा निर्माण होणार आहे त्यामुळे ओबीसी समाजात प्रचंड प्रमाणात रोष पसरला आहे यामुळे ओबीसी समाजाला याचा फटका बसू नये म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नवापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रा डॉ. महाजन, डॉ. नितीन कुमार माळी, कल्पेश प्रमोद सोनार, योगेश जगताप, सुदाम बोरसे, रामचंद्र सुतार, अजय मोहन, दर्शन ढोले, प्रकाश भोई, अतुल तांबोळी, जितेंद्र चौधरी, मोहन सोनार, योगेश जगताप, संदीप चौधरी, चंद्रकांत चौधरी, सचिन तांबोळी, राजेंद्र भावसार यांच्या निवेदनावर सह्या आहेत