
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज:- मौ.पेठवडज येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस स्टेशन कंधार व तहसीलदार कंधार यांना अनेकवेळा गावकऱ्यांकडून सुचना देऊन सुद्धा काहीच कार्यवाही होत नसल्याने अवैध धंद्यांना अधीक बळ मिळत आहे व अवैध धंदे अधिक मोठ्या प्रमाणात चालत आहेत म्हणून जुगारी, दारुड्यांचा नाहक त्रास गावकर्यांना, विशेषता -विध्यार्थ्यांना, महीलांना,शासकिय कार्यालयानां , व्यापार्यांना सहन करावा लागत आहे.
म्हणून गजानन जाधव यांनी दि. १४/१२/२०२१रोजी जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर व जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांना निवेदनाद्वारे सुचना दिल्या तरीही अद्याप कसलीच कार्यवाही झाल्याचे दिसून आलेले नसल्याने दि. १४/०१/२०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा ईशारा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे गजानन जाधव यांनी दिले..