
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मुक्ताईनगर
सुमित शर्मा
मुक्ताईनगर (जळगाव):मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा (काकोडा) येथे परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था संचालित कला ,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा (काकोडा )येथे दिनांक २५/१२/२०२१ रोजीमाजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती चे औचित्य साधून भव्य नेत्रतपासणी शिबिर व राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत रक्तदान शिबिरआयोजित करण्यात आले होते.शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी व अल्प दरामध्ये चष्मा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या नेत्रतपासणी शिबिराला पंचक्रोशीतील मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा पुरेपूर लाभ घेतला.नेत्रतपासणी शिबिर या कार्यक्रमाची सुरुवात माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हार व पुष्पगुच्छ सर्व मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. यावेळेस कार्यक्रमाला संस्थेचे सचिव भालचंद्र कुलकर्णी सर, कोषाध्यक्ष पुरणमल चौधरी ,संस्थेचे सदस्य प्रभाकर सुशील ,सुरंगी दादा, तेली सर, टावरी दादा , तसेच नेत्र तपासणी साठी आलेले मांगीलालजी बाफना नेत्र पेढी व चिकित्सालय, जळगाव डॉक्टर समाधान चौधरी, किरण तोडकरी, सौ राजश्री डोल्हार तसेच पंचक्रोशीतील मंडळी शालिग्राम सोनवणे सर, देविदास दांडगे, रवी राजपूत, प्रवीण शिंपी, अज्जू सर, राजेंद्र सोनवणे, विनोद पाटील, राजू सावळे, सौ विद्या ताई विनोद पाटील ,रमेश ढोले, नंदू खिरलकर ,देविदास नाहीसे ,राधेश्याम शर्मा, ललित भगिरिते,सोपान झाल्टे, अजगर खान ,चंद्रकांत बोरखेडे ,अमोल खिरालकर ,विशाल झालटे ,विष्णू झाल्टे, समाधान गवडे ,रामेश्वर ढोले, ज्ञानेश्वर ढोले, निखिल भोलांकर, शुभम कांडेलकर , राहुल रोडळकर तसेच संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गावकरी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती