
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद:- औरंगाबाद येथुन जवळ आसलेल्या सुदामवाडी येथे दि २२/१२/२०२१ रोजी महाऊर्जा व ऊर्जा क्लब जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुदामवाडी यांच्यावतीने ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ जि प उच्च प्राथमिक शाळा सुदामवाडी येथे संपन्न झाला .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैजापूर तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक श्री धोंडीरामसिंग राजपूत व अजिंठा केबल नेटवर्क चे संचालक तथा पत्रकार श्री किरण राजपूत हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते .विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या इ 1ली ते आठवीपर्यंतच्या रांगोळी, वक्तृत्व, वाद-विवाद, चित्रकला, घोषवाक्य, निबंध या स्पर्धांमध्ये क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण समारंभ पार पडला. याप्रसंगी धोंडीरामसिंह राजपूत यांनी शाळेला स्वतः लिहिलेली पुस्तके भेट दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सूर्यवंशी सर यांनी सूत्रसंचालन श्री मनोज सोनवणे सर यांनी आभार प्रदर्शन सुयोग बोऱ्हाडे सर यांनी केले. परीक्षकांची जबाबदारी श्री संजय जाधव सर व श्रीमती ज्योती निकम मॅडम व रामदास पवार सर यांनी पार पाडली . श्री संजय शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी बाळासाहेब सोनवणे, चांगदेव पवार, सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.