
दैनिक चालु वार्ता
लोहारा प्रतिनिधी
महेश गोरे
लोहारा :- लोहारा उमरगा तालुक्यातील अवैध व्यवसाय तसेच वीटभट्टीवर काम करणारे बालमजूर यांच्यासाठी फकीरा ब्रिगेड यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनांना संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी लोहारा यांनी पाठिंबा दिला असून 1 जानेवारी पर्यंत उमरगा लोहारा तालुक्यातील अवैध व्यवसाय दारू मटका लॉटरी तसेच अन्य व्यवसाय व अवैध पणे चालू असलेल्या वीटभट्ट्या व त्या वीटभट्ट्यांवर बालकामगार काम करत असून त्यांच्याकडून गुलामाप्रमाणे काम करून घेतले जात आहे.
उमरगा लोहारा तालुक्यातील अवैध धंद्या मुळे अनेक संसार उद्धवस्त होत असून त्यामुळे सामाजिक आर्थिक परिस्थिती लोकांची खालावत चालली आहे दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की उमरगा लोहारा तालुक्यात अवैध वीटभट्टी असून शासनाचा लाखो रुपयांचा टॅक्स न बघता महसूल विभागाच्या व प्रदूषण मंडळाच्या परवानग्या न घेता सदरच्या वीटभट्ट्या चालू आहेत वीटभट्टीवर बालमजूर देखील काम करत असून याकडे प्रशासनाचा दुर्लक्ष होत असल्यामुळे कित्येक मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत यामुळे शासनाने केलेल्या सक्तीचे व मोफत शिक्षणाला हरताळ फासला जात असून याकडे प्रशासनाला लक्ष देण्याची गरज असल्याच्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे जर 1 जानेवारीपर्यंत लोहारा उमरगा तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले नाही तर फकीरा ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड कामगार आकडी लोहारा यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला
यावेळी फकीरा ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष श्रीरंग सरवदे संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी लोहारा तालुका अध्यक्ष महेश गोरे नागिन थोरात, शितल वाघमारे,पार्वती झुंजारे ,नागिन काळे ,रूपाली दडे,रुपाली दडे,संजय सरवदे,आर्जुन सरवदे,शेखर सरवदे, सुनिता कांबळे निकिता कांबळे रुक्मिणी कांबळे ज्ञानोबा कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी येणेगुर दूरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.