
दैनिक चालू वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर -: येथील महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करतांना तहसिलदार यांनी बैलगाडी पकडून कारवाई करून बैलासह वाळूने भरलेल्या गाड्या जप्त केल्या आहेत. ट्रॅक्टर हायवा बिनधास्त सुरू आपण मात्र बैलगाडीवर कारवाई करू या कारवाईने सोशल मीडियावर महसूल विभागाची नेटकर्यांकडून टिंगल उडवली जात आहे.
ट्रॅक्टर व वाळूच्या हायवा अवैध उपसा करून वाहतूक करीत असतांना याकडे सपशेल दुर्लक्ष करून बैलगाडी कारवाई केल्याने *ए अंधा कानून है जाने कहा दगा दे दे जाने कीसे सजा दे दे साथ ना दे मजलूमो का ये साथी है चोरो का* अश्या गीतातून महसूल विभागाने केलेल्या कारवाईवर नेटकर्यांनी सोशल मिडियावर विडिओ शेर करून ताशेरे ओढले आहेत. महसूल विभागाने बैलगाड्या पकडून पोलिस ठाण्यात आणून जप्त केल्या आहेत. तर बैलांना नगर पालिकेच्या कोंडवाड्यात ताब्यात देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अवैध वाळू उपश्यावर कारवाईकडे महसूल विभाग कानाडोळा करीत आहेत. वाळू उपश्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.