
दैनिक चालु वार्ता पालघर
मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
जव्हार-: आदिवासी ग्रामीण तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावे म्हणून निरनिराळ्या विकास योजना राबविण्यात येत असतात,शासन प्रशासन स्तरावर एकत्र येऊन गाव-पाडे विकास केला जात असतो,परंतु गेल्या 2 वरश्यापासून जव्हार पंचायत समितीच्या मासिक सभेत उपसभापती आणि सदस्यांनी उपस्थित केलेली विकास कामे प्रशासन करत नसल्याने आजची मासिक सभा अर्ध्यात गुंडाळण्यात आली.
भौगोलिक दृष्टया या भागातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे,4 महिने शेती करून 8 महिने कसे बसे जीवन जगायचे असे चित्र या भागांत साधारण 4 पिढी पासून आहे.भूमिहीन शेतकरी शेत मजुरीची कामे संपली की शहराची धाव घेऊन आपला उदरनिर्वाह करीत असतात. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने गाव पाडे विकसित करणेसाठी पंचवार्षिक निवडणूक घेऊन निवडून आलेले पदसिद्ध पदाधिकारी ग्राम पंचायत, पंचायत समिती या ठिकाणी शासन करण्यात रुजू होतात.आणि आपापल्या मतदार संघातील विकास कामे, समस्या आणि सुविधा लक्ष्यात घेत मासिक सभेत विषय मांडून प्रगती करीत असतात.
गेल्या 2 वरश्यापासून जव्हार पंचायत समितीच्या अनेक मासिक सभा झाल्या आहेत,त्या सभेत घेतलेला विषय प्रशासन स्तरावर वेळेवर निकाली न काढणे,सदस्यांना योग्य प्रकारे विकासकामांची माहिती न देणे ,सध्यस्थीतीत अहवाल न मिळणे अश्या अनेक समस्या पंचायत समिती सदस्यांनी बोलताना सांगितले आहेत.लोक प्रतिनिधी जनतेचे सेवक आहेत याउलट पंचायत समिती प्रशासन हे पगारी सेवक असताना कामे करण्यात अनियमितता, टाळाटाळ करणे, खोटा अहवाल,भूल थापा मारून दिशाभूल करणे असा प्रकार पंचायत समिती प्रशासन करीत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.लोकप्रतिनिधी आपल्याला 15 हजार नागरिकांच्या मताने निवडून दिला जातो,गावाच्या विकासासाठी सभेत विषय मांडत असतो,परंतु सभा झाली की विषयाला केराची टोपली,अशी अवस्था पंचायत समिती कडून केली जात आहे ही बाब अतिशय गंभीर आहे.
आदिवासी भागात 15 टक्के अधिक वेतन घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने सदस्य आणि सभापती यांच्या विषयांना अग्रक्रम देने गरजेचे आहे.कोणत्याही सभेसाठी शासन स्तरावर नियमावली गठीत करण्यात आलेली आहे,आचे पालन होणे आवश्यक आहे.सभापती,उपसभापती, सदस्य यांना आदरपूर्वक वागणूक देने प्रशासनाचे परम कर्तव्य आहे,याचा जव्हार पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला विसर पडला आहे की काय?असे प्रश्न सदस्यांना पडले आहेत.गावच्या विकासासाठी प्रशासनाने सदस्यांचे प्रश्न समजून त्यांची त्वरित पूर्तता होणे गरजेचे आहे.
मी साकुर गणातून 15 हजार नागरिकांचे नेतृत्व करत असून गेल्या 2 वरश्यापासून मासिक सभेत अनेक प्रश्न उपस्थित केले पण बरेचसे प्रश्न अधांतरी राहिले आहेत,शिवाय प्रशासनाला एका प्रश्नांची आठवण 3 ते 4 मासिक सभेपर्यंत द्यावी लागत आहे.प्रशासनाकडून कोणत्याही कामाची सद्यस्थिती माहिती पुरवली जात नाही किंवा कल्पना दिली जात नाही. माझ्या मतदार संघातील अनेक विकास कामे प्रलंबित आहेत,शिवाय झालेल्या भ्रष्टाचार मध्ये 3 ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येत होती,परंतु केवळ एकावर कारवाई झाली असल्याचे समजले आहे,ते देखील प्रशासनाने अधिकृतपणे कळविले नाही,2 ग्रामसेवक हे खुलेआम फिरत आहेत.त्यांना कारवाईच्या बडग्याची कोणतीही भीती नाही.
मीरा गावित,जव्हार, पंचायत समिती, सदस्या
विकास कामे उपस्थित केल्यानंतर वेळेत विषय हाती घेतला जात नाही,सध्यस्थीतीत असणाऱ्या कामाची स्थितीची कोणतीही कल्पना दिली जात नाही. ज्योती बुधर,जव्हार, पंचायत समिती, सदस्या
गेल्या 2 वरश्यापासून मी जव्हार पंचायत समितीचा उपसभापती पदाचा पदभार सांभाळत आहे,प्रशासन कोणत्याही प्रकारे सदस्य,सभापती व उपसभापती यांना जुमानत नसून शासन प्रशासन स्तरावर सांगड करून काम करण्याची मानसिकता नाही,या भागातील आदिवासी नागरिक उपेक्षित राहत असल्याचे कारण प्रशासनाची अनियमितता आहे.चंद्रकांत रंधा,उपसभापती, जव्हार पंचायत समिती पंचायत समितीच्या सन्माननीय पदाधिकारी यांचा आदर नेहेमीच करण्यात येत असतो,त्यांनी सुचविलेले विषय विभाग प्रमुख यांच्याकडे दिले जात असतात,अपुऱ्या कर्मचारी आणि अधिकारी संख्येमुळे कामे होण्यास काहीसा विलंब होत असतो,प्रशासन नेहेमीच सदस्य आणि सभापती आणि उपसभापती यांच्या वेळोवेळीच्या सूचनांचे पालन करेन.समीर वाठारकर,गट विकास अधिकारी,पंचायत समिती,जव्हार विजया लहारे, जव्हार, पंचायत समिती, सदस्या