
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी सिडको(विक्रम खांडेकर)
सिडको :- आज दिनांक 25.12.2021 रोजी सिडको येथील श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स इथे एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या ठिकाणी पोलीसानी पहानी केली आहे.
ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सिडको या भागात झाली आहे ,सकाळच्या वेळी या ठिकाणी अनेक बघ्यांची गर्दी झाली होती पोलिसांनी या ठिकाणी ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असून ती अजून पर्यंत पटली नाही ,त्यामुळे अद्याप तरी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आहे असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे . ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे, सरकारी नियमानुसार काही दिवसापर्यंत हा मृतदेह शवा घरात ठेवण्यात येणार आहे असे समजते . व्यक्तीचे वय अंदाजे 60 वर्ष ते 65 वर्ष असून रंग गव्हाळ वर्ण आहे सदरील व्यक्ति बाबत अधिकचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत होत आहे.