
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मंनधरणे.
देगलूर : जिल्ह्यात अवैध धंद्यानी डोकेवर काढले असुन मोठ्या प्रमाणा अवैध दारू, गुटख्याची विक्री होत आहे. दरम्यान पोलिसांनी धाड टाकुन ५३ हजार ५५० रूपयाचा अवैध गुटखा पकडल्याची घटना देगलूर तालुक्यातील मरखेल येथे घडली. या प्रकरणी मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासुन अवैध धंदे फोफावले आहेत. सर्रासपणे दारू, गुटखा, बायोडिझेलची विक्री होत आहे. शहरातील अनेक पानटप-या, हॉटेल, दुकानांवर अवैध दारू व प्रतिबंधीत गुटखा चोरट्या मार्गाने विक्री केल्या जात आहे. तर ग्रामीण भागातही काहीशी परिस्थिती अशीच आहे. गावा गावात बेकायदेशीररित्या अवैध देशी व गावठी दारूची विक्री होताना दिसत आहे. गावात सहज दारू व गुटखा उपलब्ध होत असल्याने युवकाचा व्यसनाकडे जास्त कल वाढला आहे.
त्यामुळे तरूण पिढी पुर्णत: व्यसनाच्या आहारी गेली आहे.त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. दरम्यान पोलिसांनी याविरूद्ध कंबर कसली असुन, एका ठिकाणी धाड टाकुन जवळपास ५३ हजारा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मरखेल येथे एका व्यक्तीकडे प्रतिबंधीत गुटखा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी दि.२३ डिसेंबर रोजी धाड टाकुन अरोपीने बेकायदेशीर साठवलेला ५३ हजार ५५० रूपयाचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोह बाबाराव बंडगर यांच्या फिर्यादीवरून मरखेल पोलिस ठाण्यात गुुरनं २५१/२०२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास सपोनि मद्दे हे करीत
आहेत.