
दैनिक चालु वार्ता
कंधार -लोहा विशेष प्रतिनिधी
ओंकार लव्हेकर
कंधार :-‘ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परतब्रम्ह तस्मै श्री गुरुवेद नमः’असाच एक दुर्मिळ योग कंधार शहरामध्ये घडून आला. पंधरा वर्षापुर्वी सेवानिवृत्त झालेले शिक्षक चक्क आज विद्यार्थ्याच्या भेटीला येऊन दुर्मिळ योग घडून आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कंधार शहरांमध्ये मूळ वास्तव्यास असणारे पण सेलू येथे राहणारे सहशिक्षक नागेश लव्हेकर यांना काही दिवसापूर्वी अर्धांगवायूचा झटका सेलू येथे आला. व पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले. त्यानंतर त्यांचे मूळ गाव कंधार येथे राहावयास असल्यामुळें सदरील नागेश लव्हेकर हे शिक्षक कंधार येथे आले. त्यामुळे त्यांची वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली. हि बातमी वाचून श्री .शिवाजी कॉलेजचे त्यांना शिकविले प्रसिद्ध शिक्षक व आदर्श प्राध्यापक डी .के .पाटील सर यांना ही बातमी वाचण्यात आल्यानंतर ते आपल्या आवडत्या विद्यार्थ्याला भेटण्यासाठी चक्क जावयाला घेऊन त्यांनी कंधार गाठले. त्यांना भेटायला त्यांना शिकविलेले गणिताचे आदर्श शिक्षक पाहून नागेश लव्हेकर यांना आनंद झाला.पाटील सरांना सेवानिवृत्त होऊन पंधरा वर्ष ओलांडुन गेली .तरी सदरील शिक्षक हे भेटण्यास आले हे विशेष.श्री .शिवाजी कॉलेज कंधार येथे बी. एस .सी या तीनही वर्षाला गणित हा विषय शिकवत होते.
सदरील हे प्राध्यापक व विद्यार्थी जे काही आवडते विद्यार्थी होते. त्या काळात ह्या आवडत्या विद्यार्थ्यांपैकी नागेश लव्हेकर हे एक विद्यार्थी होते. सदरील सहशिक्षक लव्हेकर यांनासुद्धा या डी. के .पाटील सरांचा खूप लळा होता. व हा विद्यार्थी सुद्धा गणितामध्ये पारंगत झाला व सदरील विद्यार्थी लव्हेकर यांना सुद्धा सद्यस्थितीत सेवानिवृत्ती ला केवळ पाच वर्षे राहिले आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीला आलेला आपला विद्यार्थी व सेवानिवृत्त होऊन पंधरा वर्षे ओलांडली तरी चक्क विद्यार्थ्याच्या भेटीला आलेले शिक्षक आल्यामुळे गुरू-शिष्याची परंपरा व माया ही पूर्वीपासूनच असल्यामुळे यांच्या भेटीमुळे सर्वच कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. तर यांच्यासोबत प्राध्यापक पाटील सरांचे जावई नेताजीराव चौधरी हे मंठा जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक या पदावर आहेत. तर यावेळी सेलूचे गुरु संतोष जोशी व कंधार मधील प्रसिद्ध डॉक्टर प्रकाश सादलापुरे या शुभ प्रसंगी लव्हेकर संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
पुन्हा एकदा गुरू-शिष्याची परंपरा एक आदर्श व दोन्ही आदर्श प्राध्यापक व शिक्षक यांच्या भेटीचा योग समाजापुढे आदर्श ठेवण्यात आला.