
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
जालना :-धनगर जमातीचा इतिहास खूप खूप जुना आहे, पण तो दुसऱ्यांनी मांडण्यापेक्षा स्वत: धनगर समाजातने मांडणे खूप महत्त्वाचा आहे, आणि त्यातून सकल मानवी समुदायाचं दर्शन धडवणे हा उद्देश असावा, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व धनगर आरक्षण चळवळीचे अभ्यासक आणि मार्गदर्शक विचारवंत मा. डॉ. यशपाल भिंगे सरांनी केलं , ते धनगर प्राध्यापक महासंघ, महाराष्ट्र राज्य आयोजित समाज जागृती व्याख्यान मालिकेत *”लेखकांच्या दृष्टीकोनातून धनगर समाज“* या विषयावर बोलत होते. समाज जागृती घडविण्याच्या उद्देशाने प्रत्येक गुरुवारी सांयकाळी 6:00 वाजता धनगर प्राध्यापक महासंघाच्या वतीने विविध उपक्रम ऑनलाईन आयोजित केली जातात. त्याचाच भाग म्हणून 23.12.21 रोजीच्या समाज जागृती पर व्याख्यानाचे आयोजन धनगर प्राध्यापक महासंघ कोल्हापूर जिल्हा कार्यकारणीने केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाजाचे मार्गदर्शक डॉ. एम. टी. हजारे सर होते. डॉ. यशपाल भिंगे यांनी अभ्यासपूर्ण व वक्तृत्वपूर्ण शैलीत धनगर जमातीविषयी आपली निरीक्षणे मांडलीत. ते पुढे म्हणाले की, मातीवर मुळाक्षरे गिरवणारा धनगर समाज काळाच्या ओघात मागे का राहिला तर त्याला धनगर जमातच बहुतांश जबाबदार आहे. जाज्वल्य इतिहास लाभूनही ही जमात काळानुसार बदलली नाही. हिंदू संस्कृतीतील वेद म्हणजे धनगरांची गाणी आहेत. जमिनीशी नाती असणारा हा समाज आहे. भारतीय संस्कृतीचा उदय या आदिम जमतीपासून झाला आहे पण हे आपण जगाला पटवून देणे गरजेचे आहे, तेही वैचारिक दृष्टिकोनातून. जेंव्हा आपण लेखकांच्या दृष्टीकोनातून धनगर समाज बघतो, तेंव्हा आपल्या समाजातील लेखक किती आहेत, वा आपण काय करतो आहोत ही विचार करण्याची गरज आहे. समस्या आपल्या आहेत, ते सोडवणे व ते इतर समाजासमोर मांडणे हे आपले काम आहे. त्यासाठी प्राचीन विद्या शास्त्राचा अभ्यास करा, संशोधन वृत्ती बाळगा, त्यानंतर साहित्य लिहा, पण ते वास्तव असावे, त्यात धनगर समाजाची वृत्ती कशी आहे ते मांडा, त्यातून धनगरांचे नव्हे तर मानवी समाजाचे दर्शन घडवा, आपण वेगळे आहोत हे दाखवण्यापेक्षा आपल्या समस्या काय आहेत हे इतर समाजाला दाखवा, त्यासाठी अभ्यास करा, असे मार्गदर्शन त्यांनी या वेळी केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ . हजारे सर म्हणाले की, वाचन आणि लिखाण या गोष्टी चळवळीला बळकटी देतात, ते आपण आत्मसात केली तरच समाज जागृतीचे कार्य यशस्वी होईल.
सुरुवातीस कोल्हापूर जिल्हा धनगर प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार मासाळ यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले, प्रमुख वक्त्यांची ओळख कोल्हापूर जिल्हा धनगर प्राध्यापक महासंघाचे खजिनदार प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी तर आभार कोल्हापूर कार्यकारिणीचे संघटक डॉ. सतीश लवटे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनगर प्राध्यापक महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीचे सचिव डॉ. रावसाहेब शेळके यांनी केले.
या समाज जागृती उपक्रमांतर्गत व्याख्यानांचे आयोजन धनगर प्राध्यापक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने, महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शिरसाठ, उपाध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानदेव काळे, प्रा. डॉ. संगीता चित्रकोटी मॅडम, सचिव प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी, सहसचिव प्राचार्या संगीता पुंडे मॅडम, सहसचिव प्रा. डॉ. धनराज धनगर, खजिनदार , डॉ पिराजी डूमनुर, कोल्हापूर कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अमरसींह शेळके , मार्गरदर्श डॉ. करपे सर व महासंघाचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी मार्फत करण्यात आले. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील कृषी शास्त्रज्ञ डॉ. शिवाजीराव ठोंबरे, पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे माजी प्रमुख प्रा. डॉ. बजरंग कोरडे इ. मान्यवर तसेच तमाम धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी व सदस्यांनी परिश्रम घेतले.