
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
कोरोनाच्या ‘ओमायक्रोन’ विषाणुने सारे जगच पुन्हा एकदा वेठीस धरले आहे.. या व्हेरियंटमुळे अनेक देशांमध्ये परत ‘लाॅकडाऊन’ करण्यात येत आहे.. कोरोनातून सावरत असणारे देश या विषाणुमुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.भारतातही ‘ओमायक्रोन’चा धोका वाढत असून, देशातील रुग्णसंख्या 400 च्या पुढे गेली आहे.. त्यातही महाराष्ट्र आघाडीवर असून, रोज ‘ओमायक्रोन’ बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे..
कोरोनाच्या ‘ओमायक्रोन’चा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शुक्रवार (ता. 24) पासून राज्यात ‘नाईट कर्फ्यू’ जाहीर केला आहे. त्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. केंद्र सरकारही याबाबत सतर्क झाले असून, विविध राज्यांमध्ये केंद्राची पथके पाठविण्यात आली आहेत.महाराष्ट्रात ‘ओमायक्रोन’चा धोका वाढत असताना, नागरिकांना वेगळ्याच प्रश्नाने घेरले आहे. ते म्हणजे, राज्यात पुन्हा एकदा कडक लाॅकडाऊन केले जाणार का..? याबाबत खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलेय..
मंत्री टोपे काय म्हणाले…?
राज्यात कडक नियमावलीची अंमलबजावणी सुरु केल्याने राज्याची वाटचाल लाॅकडाऊनच्या दिशेने सुरु आहे का, या प्रश्नावर आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, की एकाच वेळी गर्दी होऊ नये, म्हणून खबरदारीच्या उद्देशाने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत..!” राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावताना टोपे म्हणाले, की “लॉकडाऊनचा निर्णय घेताना यापुढे ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या अनुषंगानेच घेतला जाईल. राज्याला ज्या दिवशी ८०० मेट्रीक टन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल..!” निर्बंधाचा चुकीचा अर्थ नको.“कोरोना संसर्गाची गती अधिक असल्यास, ऑक्सिजनची ८०० मेट्रीक टन गरज ५०० मेट्रीक टनांवर आणावी लागेल. राज्यात आम्हाला कडक निर्बंध लावायचे नाहीत. तसा आमचा हेतूदेखील नाही. फक्त नागरिकांच्या काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. त्याचा चुकीचा अर्थ काढू नये,” असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, “राज्यात ‘ओमायक्रॉन’चा प्रसार दुप्पट वेगाने होतोय. त्यामुळे सगळ्यांनी सतर्कता बाळगावी. ‘ओमायक्रॉन’साठी ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमीच आहे. राज्यात कोरोना लसीकरणही जोरात सुरु आहे. आतापर्यंत 87 टक्के लोकांनी पहिला, तर 57 टक्के लोकांचे दोन्ही डोस झालेले आहेत..!”