
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
अंबड :-अंबड शहर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असुन अहिल्यादेवी या शहराच्या निर्मात्या असुन जगाच्या नकाशावर अंबड शहराची नवी ओळख निर्माण केलेली आहे. शहरातील श्री. मत्स्योदरी देवी मंदिरासमोर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे साप्ताहिक पुजनाचा उपक्रम सुरू केला असुन यानिमित्ताने दर रविवारी माँसाहेबांच्या पुतळ्याला एक पुष्पहार अर्पण होत आहे.तसेच पुतळ्याची साफसफाई होवून दररविवारी नवीन समाज बांधवासमवेत एकत्र येता येते. या उपक्रमाची फेसबुक, व्हाटसप तसेच वर्तमानपत्रातुन चांगली प्रसिद्धी झाली असुन आपण ही आपल्या परिवारासह या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
आपला इतिहास,प्रतिके (देवी,देव,दैवत,कुलदैवत, संस्कृती परंपरा) याचे ज्ञान व्हावे तसेच आपल्या पुर्वजांच्या शौर्य पराक्रमासह कर्तृत्वाच्या यशस्वी गाथा आपल्या भावी पिढीला कळाव्यात यासाठी हा उपक्रमात सहभागी व्हा.दर शनिवारी अनेकांना वैयक्तिक निमंत्रण पाठवले जाते.
*दि.26 डिसेंबर 2021* *रविवार रोजी सकाळी 10:10 वाजता.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे साप्ताहिक पुजन *सौ.ज्योती विलास नेमाने रा.माजलगाव जि.बीड* यांच्या शुभहस्ते व *सौ.भाग्यश्री भागचंद खरात* यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या वेळी श्री.रामभाऊ लांडे,लक्ष्मण बेवले सर,श्री. मुकेश गाडेकर सर,जय खरात,भागचंद खरात,सचिन मैंद उपस्थित राहणार आहे*
◆ *विनीत-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थान ,अंबड* **
—————————-
◆ *स्थळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा, श्री. मत्स्योदरी देवी मंदिर अंबड*
सर्वांना आपल्या इतिहास, जातीचा, जातीत जन्मलेल्या युगपुरुष, थोरपुरुष, साधुसंताचा अभिमान वाटतो यात आपण कुठे आहोत याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.
—————————-
*श्री. विलास नेमाने* हे माजलगाव जि.बीड येथील सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे तरुण कार्यकर्ते असुन ते सपत्नीक पुजेसाठी अंबडला येत असुन संयोजन समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शिल्पाचे पतीपत्नी मिळून जोडीने पुजन करण्याचा देशातील पहिला उपक्रम असुन गावागावातील स्मृती शिल्पाचे दर रविवारी पुजन व्हावे याच या उपक्रमाचा हेतू आहे.
धन्यवाद