
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि वडेपुरी
मारोती कदम
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता ताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री शासकीय रुग्णालय परिसरात रस्त्यावर झोपलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ब्लँकेटचे वाटप करून मायेची ऊब देण्यात आली निराधार गरजू लोकांसाठी मायेची ऊब हा उपक्रम संयोजक दिलीप ठाकूर सर्व दानशूर व्यक्ती कडून चालवत असतात आणि या उपक्रमांतर्गत शुक्रवारी निराधार गरजू लोकांना शासकीय दवाखान्याच्या परिसरामध्ये ब्लँकेटचे वाटप करण्यासाठी आज या उपक्रमाच्या सातव्या दिवशी शुक्रवारी प्रणिता ताई देवरे यांनी उपक्रमाला भेट देण्यासाठी मध्यरात्री आवर्जून उपस्थित राहिल्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील परिसरात अनेक रुग्णांचे नातेवाईक जागेअभावी रस्त्यावर झोपले होते .पुरेशे उबदार पांघरूण नसल्यामुळे थंडीने कुडकुडत होते यावेळी प्रणिता ताई यांच्या हस्ते त्यांना उबदार ब्लॅंकेट देण्यात आले ताईनी अनेक महिला नातेवाईकाची आस्थेवाईकपणे चौकशी केली रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्म शाळेचा विस्तार करण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबां मार्फत सरकारचा पाठपुरावा करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे यावेळी त्यांनी सांगितले .ब्लँकेट वाटप करत असताना ॲड. दिलीप ठाकूर भाजपा जिल्हा सरचिटणीस, भाजपा सक्रिय सदस्य कामाजी सरोदे ,हनुमान पेठ मंडळ सरचिटणीस कपिल यादव, योगेश निरणे ,गणेश उंद्रे, ऋषी बेंद्रे, विशाल कदम ,राहुल गजभारे, सुरेश निलावार, प्रशांत पळसकर, बिरबल यादव ,हे उपस्थित होते ताईंनी या सिडको व विष्णुपुरी परिसरातील निराधार लोकांना प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन ब्लँकेटचे वितरण केले खरोखरच प्रणिता ताईंचे हे समाजकार्य अतुलनीय आहे कारण स्वतः इतक्या थंडीच्या कडाक्यात संध्याकाळच्या वेळेस प्रणिताताई ह्या स्वतः हजर राहून त्यांनी हे कार्य पार पाडले भाजपा नांदेड महानगर लायन्स क्लब नांदेड च्या वतीने दुसऱ्या वर्षी आतापर्यंत सतराशे पन्नास ब्लॅंकेट चे वितरण झाले आहे व कुणाला ब्लॅंकेट वाटप मायेच्या उब उपक्रमांतर्गत द्यायचे असतील तर संयोजक दिलीप ठाकूर यांनी मदतीचे आव्हान या उपक्रमाच्या वतीने केले आहे