
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
सावंगी खुलताबाद :- राष्ट्रीय किसान दिन निमित्ताने बाजार सावंगी खुलताबाद येथे ढाल फाउंडेशनचे पहिले वर्धापन दिन व शेतकरी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणूनसर्वानुमते सातत्याने प्रहार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाचा सातत्याने प्रयत्न करणारे आता पर्यत अनेक शेतकऱ्याचे प्रश्न तडीस नेले आहे . याच कार्याची दखल घेत भाऊसाहेब शेळके यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि शेतकरी नेता उपाधीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आला . स्वागत अध्यक्ष जानकीराम नलावडे, विठ्ठल म्हस्के गंगापूर , निखिल सूक्रे परभणी,अजय साबळे वर्धा यांना शेतकरी योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ढाल शेतकरी फाउंडेशन चे कर्तव्य दक्ष शेतकरी संजय दादा पवार यांनी अधिवेशनाला उपस्थितांचे आभार मानले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी ढालचे किरण वालतुरे,राजेंद्र गावंडे,सह वर्धा ,बुलढाणा, परभणी, जालना,नांदेड, औरंगाबाद,जळगाव सहइत्यादी शहरातून शेतकरी सहभागी झाले होते.