
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
मजरे धर्मापुरी:- येथील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून धर्मापुरी ते रायवाडी जोडणारा रस्ता हा पायी चालण्याच्या लाईकीचा राहीला नाही.या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मजरे धर्मापुरी येथील शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. कारण काही वर्षापुर्वी या रस्त्याने महामंडळाची गाडी जात होती;रस्ता होता पण जि.प. नांदेड च्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याची दुरूस्ती न केल्यामुळे रस्ता होत्याचा नव्हता झाला असून,शेतकऱ्यांनी नगदी पिक म्हणून ऊसाची लागवड केली असून ऊस तोडणीला येऊन वाळून जात आहे. कारण येथील ऊस कारखान्यापर्यंत जाण्यासाठी रायवाडी शिवेपर्यंत रस्ताच राहीला नाही मजरे धर्मापुरी ते रायवाडी शिवेपर्यंत 3 की.मी. रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. येथील नागरीकांनी आमदार,खासदार, पालकमंत्री,जि.प.सदस्य, प.स.सदस्य यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत रस्त्यासाठी पाठपुरावा केला असून या रस्त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसून आता तरी कोणी लोकप्रतिनिधी असतील तर मजरे धर्मापुरी ते रायवाडी रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मजरे धर्मापुरी येथील शेतकऱ्यांनी दैनिक चालू वार्ताचे मुख्य संपादक श्री डी. एस. लोखंडे पाटील व कंधार तालुका प्रतिनिधी माधव गोटमवाड यांना शेतकऱ्यांनी मुलाखत देवून ऊसाचे होणारे नुकसान व झालेला खर्च पाहून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यावाचून दुसरा मार्गच राहीला नसून होणाऱ्या नूकसाणीस सरकारच जबाबदार असून सरकारने लवकरात लवकर मजरे धर्मापुरी ते रायवाडी रस्ता झाला पाहिजे अशी मजरे धर्मापुरी येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे तरी यांची जि.प.नांदेड यांनी नोंद घेवून लवकर कामाला सुरुवात करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.