
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
मुंबई: भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडीओ 7 नोव्हेंबर 2021 असल्याचा दावा केला आहे. तो व्हिडीओ आटपाडी पोलीस स्टेशनच्या दारातला असून तिथं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. तो हल्ला सुनियोजित होता, माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूनं 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना बघायला मिळतात. हा सगळा कट पोलीस सरंक्षणात घडवून आणला जात आहे. सदर घटना थांबवण्याचऐवजी पोलीस चित्रीकरणात मग्न होते, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
जयंत पाटील आणि पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप
गोपीचंद पडळकर यांनी या हल्ल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केलं आणि माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्यानं बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षकचं जर भक्षकात सामील झाले असतील तर विश्वास कुणावरती ठेवायचा असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातील लढा चालूच ठेवेन, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र पोलीसांचा बॉडीगार्ड नाकारला
तो हल्ला आटपाटी पोलीस स्टेशनच्या दारात झाला आहे. माझी गाडी ज्या दिशेनं येत होती त्याच्या विरोधी बाजूला 200 ते 300 लोक उभे राहिले होते. पोलीस बघत होते, शुटिंग करत होते. मी थांबलो की माझा मर्डर करण्याचा प्लॅन होता, असा धक्कादायक आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत त्यामुळं मी बॉडीगार्ड नाकारल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले. हे सर्व प्रकरण सागंली जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान घडलं होतं. सोलापूरमध्येही हल्ला झाला होता त्यावेळी अमोल मिटकरी यांनी तेच उत्तर दिलं होतं. आता ज्यावेळी हल्ला तो आटपाडी पोलीस स्टेशनसमोरचा होता त्यामुळे यातील सत्य लोकांना माहिती आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.