
दैनिक चालु वार्ता
मिलिंद खरात
पालघर प्रतिनिधी
डोहोळेपाडा :- निपुण भारत अभियाना अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितोत्सवाचे आयोजन 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत करण्यात आले. भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा 22 डिसेंबर जन्म दिन दर वर्षी राष्ट्रीय गणितदिन म्हणून साजरा करण्यात येतो.शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. *जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळेत सुद्धा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.जसे-रांगोळी द्वारे भौतिक आकार काढणे, काड्यांच्या साह्याने भौतिक आकार काढणे व ओळखणे तसेच चित्र तयार करणे. टरफळा द्वारे अंक व संख्या तयार करणे व वाचने,संख्या चार्ट व संख्या पट्टी च्या साह्याने संख्या वाचने व लिहिणे,मण्यांच्या माळेच्या साह्याने एकक दशक मोजणे व संख्या वाचने. संगीतमय पाढे ऐकणे म्हणने, संगीतमय अंक ऐकणे वाचने, अंकगीता द्वारे अंकाची ओळख करुन घेणे,संख्यांचा चार्ट तयार करणे,कॅलेंडर चार्ट तयार करणे,गणित पेटीतील साहित्य हाताळणे*.इत्यादी. गणितोत्सवामध्ये सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख, मुख्याध्यापक जगदीश जाधव व विद्यार्थांनी विशेष सहभाग घेतला.