
दैनिक चालु वार्ता
परतूर/प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर:-: परतूर तालुक्यातील व परतूर शहर परिसरात वाढलेली बेसुमार वृक्ष तोड सध्या चिंतेचा विषय बनला आहे. वृक्ष तोडून वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. वन विभागाने या कडे साफ दुर्लक्ष केले आहे.परतूर शहर व परिसरात खुलेआम वृक्ष तोड होत आहे.एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वृक्ष लागवडी साठी जनजागरण करण्यात येत आहे तर अशा बेसुमार वृक्ष तोडीनें पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शहरात ठिकठिकाणी लाकडाचे साठे आहे. लाकूड वाहून नेणारे ट्रॅक्टर खुले आम वाहतूक करताना दिसत आहे. हा सर्व प्रकार इतका खुले आम चालू आहे कि या लोकांना वृक्ष तोडण्याच्या जणू परवाणाच मिळाला आहे. नागरिका मधून कारवाई करण्याची मागणी होत आहे.पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.फोटो ओळी- परतूर शहरात रात्रीच्या वेळस खुलेआम लाकडाची वाहतूक करणारी वाहने.