
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे -:दि,२५/१२/२०२१ रोजी २६/ जुना मुंबई पुणे रोड बोपोडी , शिवाजीनगर मतदार संघ पुणे येथील, सायंकाळी ७/९ या वेळेत ख्रिसमस सणाच्या निमित्ताने सालाबादा प्रमाणे केक कापून, ख्रिसमस सण साजरा करण्यात आला, यावेळेस ख्रिस्तीसंघाचे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक सुरेशभाऊ ससाणे यांचा हस्ते सर्व पक्षीय राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता व स्थानिक पातळीवर नागरिक बंधु भगिनीचा सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना काळात ज्यांनी राञदिवश काम करून लोकांपर्यंत बातमी पोहचविण्याचे काम केले, त्या पत्रकार बांधवांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आवाज कोकणचा चे पत्रकार गणेश कांबळे,पुढारीचे पञकार अमोल सहारे, सकाळच्या पञकार आरती मेश्राम, केसरीचे पञकार अनिल खुडे, राजेंद्र रासगे,रेव्ह सेंट अँन्ड्रूजचर्च खडकीचे राजेंद्र कटारनवरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी सेलचे सरचिटणीस ज्योतीताई परदेशी, माजी नगरसेविका शैलजाताई खेडेकर, पश्चिम महाराष्ट्र आर. पी. आय. चे अध्यक्ष परशुराम वाडेकर, पुणे महापालिकेच्या उपमहापौर सुनीताताई वाडेकर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मा. सौ. वसुंधराताई निरभवने, खडकीतील सामाजिक कार्येकर्ते संजयभाऊ कदम, नगरसेवक आनंद छाजेड, अॅड. रमेश पवळेसर, विठ्ठल आरूडे, विनोदभाऊ रणपिसे, डाॅ. विजय ढोबळे, सुरेश गंगाराम पवार, ख्रिस्ती संघाचे सर्व मान्यवर, युवक, युवती पदाधिकारी मोठ्या उत्साहाने सामील झाले होते, सञसंचालन ज्योतीताई परदेशी यांनी केले, व आयोजक सुरेशभाऊ ससाणे यांनी आभार मानले.