
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- देशाचे पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो, या दिनाचे औचित्य साधत शिऊर येथील भारतीय जनता युवा मोर्चा वैजापूरचे सरचिटणीस प्रमोद गुळे यांचा सन्मान करण्यात आला.
प्रमोद गुळे हे सामाजिक कार्यात पुढाकार घेत असतात.फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी उपलब्ध करून देत अनेक रुग्णांना त्यांच्या माध्यमातून आधार मिळाला आहे, वीज, रस्ता तसेच विविध नागरी समस्या प्रशासनापर्यत मांडून त्या सोडवण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड व माजी मंत्री पंकजाताई मुंडे, भाजपा राज्य कार्यकारणीचे सदस्य एकनाथराव जाधव यांचे निकटवर्तीय म्हणून गुळे परिचित आहे. स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून देखील त्यांनी मयताच्या वारसाला आर्थिक मदत मिळून दिली आहे. शनिवार दिनांक 25 रोजी तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष नबी पटेल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमोद गुळे यांचा सन्मान करण्यात आला