
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कंधार:- तालुक्यातील जाधव व्यंकटी यांनी स्वतः अनेक गावांना भेटी देऊन जनतेस स्वस्त धान्याच्या कोपन कार्ड बद्दल विचारले असता जनतेकडून असे उत्तर मिळाले की आम्हाला सरासरी वीस वर्षा पासून कार्ड मिळाले नाहीत. हे ऐकून जाधव व्यंकटी यांनी कंधार तालुक्यातील लाभार्थ्यांना कोपन कार्ड व घेतलेल्या मालाची पावती मिळावी म्हणून मा.तहसील कार्यालयात कंधार दि.28/10/2021रोजी जाधव व्यंकटी यांनी विनंती अर्ज केला होता पण त्यांच्यावर कुठलाच विचार केला नाही.कारण शासन एका बाजूने गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकाना मार्फत कमी दरात माल पुरवठा करीत असुन दुसऱ्या बाजूने गरीब जनतेसाठी पाठविलेली माल जशाचा तसा जनतेच्या पदरात पडु न देता त्यांच्या मालाची नोंदवही म्हणजे कोपन कार्ड वीस वर्षा पासून स्वस्त धान्य दुकानाचे काळे कारणामे उघड होतील म्हणून नवीन कार्ड मिळत देत नाही त्यामुळे लाभार्थ्यांस मिळणारा माल किती येतो आणि लाभार्थ्यांना आपल्याला कुटुंबांचा माल दिला जातो याची पावती दिली जात नाही प्रत्येक महिन्याला कोणता माल किती रूपये प्रमाणे तो मला दिला जातो असे कोणतेही उत्तर दुकानदारांकडून मिळत नाही. म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांन कडुन लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे जनतेच्या डोळ्यात धुळ फेकुन जनतेला उडवाउडवीचे उत्तर दिले जातात पावती निघत नाही नेट चालत नाही माल कमी देतात कट्ट्यात माल भरती येत नाही.असे अनेक कारण लावुन तो माल बचत रचून तो माल बड्या किमतीत विकण्यासाठी असे कारण दुकानदारांकडून दिले जातात व मनमानी पद्धतीने अपूर्ण माल वाटप करतात असे निदर्शनास आले आहे म्हणून जनतेस कोपन कार्ड व मालाची पावती देऊन जनतेच्या मालाची लूट थांबवावी अशी मागणी पुलिस बॉईज असोसिएशन नांदेड जिल्हा उपाध्यक्ष जाधव व्यंकटी गोविंद व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कंधारे ,माधव वडजे,माधव विभुते यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार कंधार यांच्याकडे विनंती पत्र देण्यात आले.