
दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
जळगाव:- महीलांवरील अत्याचाराला थांबवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार ने शक्ती विधेयक मंजूर करून महीलांना मोठा आधार दिला आहे.महिलांवरील व चिमुकल्यांवरील होणारे अत्याचार या विधेयकामुळे थांबुन महीला सशक्तीकरणालाही हातभार लागणार असल्याचा विश्वास महीलांमध्ये शक्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांचे लहुजी ब्रिगेड महीला आघाडीकडून स्वागत करण्यात आले आहे.महीलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा शक्ती विधेयकामुळे होणार असल्याचे महत्त्व ओळखून लहुजी ब्रिगेड महीला आघाडीने अनेक वेळा केंद्र आणि राज्य शासनाला शक्ती विधेयक मंजूर करण्यासाठी सातत्याने मागणी केली होती.हिवाळी अधिवेशनात एकमताने मंजूर मिळाल्याचे स्वागत लहुजी ब्रिगेड महीला आघाडी महाराष्ट्र प्रदेश तथा विविध सेलचे अध्यक्षा सौ.आशाताई अंभोरे, अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष यास्मीन शेख, फिरोजाबी पठान, सुगराबी शेख , नर्गीस बी अब्दुल समद,जळगाव जिल्हा अध्यक्ष सौ.निलूताई इंगळे,विद्याबाई जाधव, शारदा तायडे ,ज्योतीताई पवार, आदींनी शक्ती विधेयकाचे स्वागत केले