
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
गोणार:- गोणार येथे जनसंवाद संमेलनाचे आयोजन २७ डिसेंबर रोजी केले आहे.या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक अ.वाघमारे, उद्घाटक नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष बारूळचे मधुकर महाराज बारुळकर हे आहेत.हे संमेलन गोणारच्या सेवाभावी संस्थेने आयोजित केले आहे आणि सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र हे या संमेलनाची संकल्पना आहे.या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी पासुन, पुस्तकाच्या स्टाॅलचे उद्घाटन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर गोणारचे भुमिपुत्र सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी जे.डी.गोणारकर यांना सप्तरंगी साहित्याच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देणार आहेत तसेच इतर पत्रकारिता क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना नवयान सेवाभावी संस्थेच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ‘मराठा आरक्षण कशा आणि दिशा’या विषयावर परिसंवाद होणार आहेत व तसेच विविध विषयावरील अभ्यासक(चिंतक) हे त्या त्या विषयावर बोलणार आहेत.