
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे:-शिवसंग्राम पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांना शिव संग्राम पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन दिनाचे औचित्य साधून उपेक्षित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून, ख-या अर्थाने समाजात चांगला संदेश देवून समाजासाठी योगदान दिल्याबद्दल चंद्रकांत गायकवाड यांना समाजभूषण पुरस्कार शिव संग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.विनायकराव मेटे यांच्या हस्ते देण्यात आला.या कार्यक्रमास शिवसंग्राम पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष भरतसेठ लगड, पुणे शहराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, शिव संग्राम पक्षाचे सर्व पदाधिकारी, रक्षक न्यूज चॅनलचे संपादक सतिष राठोड, आवाज कोकणचा चे जेष्ठ पत्रकार गणेश कांबळे, प्रहार संघटनेचे भोर तालुकाध्यक्ष संतोष मोहिते यांच्यासह न-हे गावातील व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.