
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी औरंगाबाद
मोहन आखाडे
औरंगाबाद :-25 डिसेंबर 2021 रोजी ख्रिसमस निमित्त सायकल राइडचे आयोजन औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेतर्फे करण्यात आले होते. सायकल रॅली सेव्हन हिल उड्डाणपूल खालील सायकल बेट येथून संध्याकाळी आठ वाजता प्रारंभ झाली. सायकल राईडचा मार्ग सायकल बेट, महावीर चौक, छावणी व क्राइस्टचर्च असा होता.संध्याकाळची राईड असल्यामुळे सर्व सायकलपटूनी आपल्या सायकलला लाईट बसून आणले होते व पारंपरिक सॅन्टाक्लॉजचे पोशाख घालून आले होते.या राईड मध्ये संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव चरणजित सिंग संघा, सहसचिव अतुल जोशी, मनिष खंडेलवाल अमोघ जैन, रिचा जैन, सोनू शर्मा, स्टेला युरिएल, सई जोशी, रुंदा काकडे, ऋतुजा पठाडे, अजय पांडे, मोहन उन्हाळे, शंकर काकडे, अश्वमेघ पोटपेलवार, संकेत गुप्ता, मनीष जैन, चेतन पल्लवे, नवनीत कला, अश्वमेघ पोटपेलवार, संकेत गुप्ता, नरेंद्र भालेराव, सिद्धेश पणजकर, कुंडलिक पठाडे, प्रशांत वाणी आदींनी राईड पूर्ण केली.