
दैनिक चालु वार्ता
जिल्हा प्रतिनिधी
विश्वास खांडेकर
नांदेड :-सिडको-हडको भागातील एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळख असणारे ‘अनिल लक्ष्मीकांत जहागीरदार यांचे आज लोहा गंगाखेड मार्गावर पेठशिवनी जवळ अपघातात दु:खद निधन झाले.नांदेड शहरातील सिडको भागात गेल्या तीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून गणित विषय शिकवण्यासाठी प्रसिद्ध असणारे गणित तज्ञ ‘जहागीरदार कोचिंग क्लासेसचे संचालक’ अनिल लक्ष्मीकांत जहागीरदार ज्यांचे वय 56 वर्षे होते .त्यांचे आज लोहा गंगाखेड महामार्गावर एका भीषण अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्यासोबत त्यांची आई सौ.शांताबाई लक्ष्मीकांत जहागीरदार व वडील लक्ष्मीकांत देविदासराव जहागिरदार या दोघांचेही त्याच अपघातात निधन झाले.
गेल्या तीन दशकात पेक्षा अधिक काळापासून त्यांनी गणित विषयाची सेवा केली आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे करियर घडविण्याकरिता मार्गदर्शन केले आहे तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे कार्यकर्ते होते. त्यांचा शैक्षणिक, सामाजिक दोन्ही क्षेत्रात प्रभाव होता. यांच्या दुःखद निधनामुळे त्यांचे विद्यार्थी, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या माघारी पत्नी, दोन मुले आणि मोठ्या प्रमाणात नातेवाईक आहेत.