
दैनिक चालु वार्ता
लोहारा तालुका प्रतिनिधी
महेश गोरे
लोहारा:- प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने दि. १५ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान “वाचन संस्कृती जागरण पंधरवडा” उपक्रमांबाबत महत्वाची बैठक आज ॲड. शीतल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेन्यात आली होती या बैठकीत वाचन पंधरवाडा साजरा करनार आसल्याची माहती अॅॅड शितल चव्हान यांनी दिली.याअंतर्गत वाचनालयाच्या सर्व १० शाखांतील पुस्तकसंख्या वाढवण्यासाठी शहरातून *पुस्तक पालखी* काढून पुस्तकपालखीत पुस्तके देण्याचे नागरीकांना आवाहन करण्यात येणार आहे.पुस्तकपालखीच्या माध्यमातून जमलेली सर्व पुस्तके वाचनालयाच्या सर्व शाखांना विभागून देण्यात येणार आहेत.त्याचबरोबर वाचनालयांमध्ये वाचक संख्या वाढवण्यासाठी सर्व शाळा व महाविद्यालयांतून शिक्षक प्रतिनिधी व विद्यार्थी प्रतिनिधी बोलावून त्यांना वाचनालयाचे सभासदत्व दिले जाणार आहे. तसेच वाचनालयाच्या चालू वाचकांना लेखक, कवी, साहित्यिक यांच्याद्वारे मार्गदर्शनही केले जाणार आहे.
वाचनालयांतील पुस्तक संख्या वाढवणे, वाचकांची संख्या वाढवणे आणि वाचकांशी संवाद साधणे अशा तीन स्तरावर हा “वाचन संस्कृती जागरण पंधरवडा” साजरा केला जाणार आहे.
या पंधरवड्याच्या उपक्रमांबाबत महत्वाची बैठक आज ॲड. शीतल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. सत्यनारायण जाधव, मा. व्यंकट(राजू) भालेराव, माा. करीमभाई शेख, मा. राजू बटगिरे सर, मा. ॲड. ख्वाजा शेख, मा. रविंद्र गायकवाड, मा. प्रदिप चौधरी, मा. विजय चितली व मा. बबिता मदने यांच्या उपस्थितीत पार पडली.