
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी
संतोष मंनधरणे.
देगलूर -:राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज किट्टू कावटवार मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी करण्यात आले . शिबिराचे उद्घाटन राष्टवादी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष अंकूश देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळेस लक्ष्मीकांत पदमवार, मा.नगरसेवक संजय चिन्नमवार, विश्वनाथ पवार, विकास नरबागे, व्यंकट महाजन ओमकार उल्लीवार, सतिश प्रतापवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात किट्टू कावटवार मित्र परिवार उपस्थित होता.या शिबिरात 137 रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. या सर्वाचे अनील तोताडे ,नंदकिशोर शाखावार, शैलेंद्र चौव्हाण, माधव फूलारी यांनी आभार व्यक्त केले.