
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी
श्री. रमेश राठोड आर्णी
यवतमाळ:-आज दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन तसेच विविध योजनेतंर्गत विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मा आमदार संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते पार पडला.यावेळी आमदार संजय भाऊ राठोड म्हणाले की बो मतदारसंघातील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडु देणार नाही .सोबतच काही गरजू लोकांना भाऊ च्या हस्ते ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदाताई पवार,या सर्कल चे जि०प० सदस्य तथा आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर काका मोहोड,सभापती सुनीता ताई राऊत ,नामदेव जाधव,सिंधुताई रमेश राठोड,जि प सदस्य राधा ताई थरकडे, जि प सदस्य आश्विनी ताई कुरसंगे,हरिहर भाऊ लिंगणवार, माजी जि प सदस्य संगीता इंगोले सर्व पंचायत समिती सदस्य ,विविध गावातील सरपंच, उपसरपंच,तसेच विविध मान्यवर शिवसेनेचे तालुक्यातील लोकप्रतिनिधी, तालुका शिवसेनेचे विविध पदारधिकारी उपस्थित होते.