
दैनिक चालू वार्ता
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रदिप मडावी
चंद्रपूर:- शहरात आरोग्य , शिक्षण , रस्ते , गटारी या सारख्या एक ना अनेक समस्या असताना एक हाती सत्ता असल्याचा फायदा घेत चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ताधारी नागरिकांच्या पैशाची उधळण करतांना दिसत आहे. असाच काहीसा प्रकार उघडकीस आला असून एक किलोमीटर दुभाजक व ड्रेनेज बनविण्यासाठी चक्क एक करोड रुपयाचे कंत्राट काढल्याचा पराक्रम सत्ताधाऱ्यांनी केला आहे .
महानगरपालिकेत जनतेने विश्वास ठेवून भाजपला एक हाती सत्ता दिली . पण केंद्रात चाललेल्या हुकूमशाही धोरणानुसार आता चंद्रपूर मध्ये ही महापालिकेतील सत्ताधारी हुकूमशाही गाजवीत टॅक्सच्या रुपात मिळालेल्या जनतेच्या पैशाची कमिशन पोटी उधळण करत असल्याचे दिसत आहे . या वरून विरोधक आणि सत्ताधारी नेहमीच समोरा समोर येत असल्याचे दिसत असून . अनेकदा यांचे वाभाळेही बाहेर काढल्याचे दिसत आहे . असाच काहीसा प्रकार भ्रष्ट्राचाराची परिसीमा गाठत पालिकेतील एका युवानेत्याने स्वमर्जीतील कंत्राट दाराला फायदा मिळवून देण्यासाठी काही लाखात होणारे काम चक्क करोडो रुपयामध्ये दिल्याचे आम आदमी पार्टी ने केलेल्या पाहणीत उघडकीस आले आहे . या वर आवाज उठवीत संबंधितांवर सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवर यांनी पत्रकाद्वारे केली आहे . विशेष म्हणजे दाताळा रोडवर बनत असलेले दुभाजक हे या आधी दोनदा बनवले गेले आहे . एकाच कामासाठी तीनदा निवीदा काढणे आणि वाढीव इस्टीमेट देणे यात लाखो रुपयांचा गैरव्यववार यज्ञ झाला असावा असा संशय ही राईकवार यांना येत असल्याचे त्यांनी सोशल मिडिया हेड राजेश चेटगुलवार , झोन अध्यक्ष सिकन्दर सागोरे सोबत फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून बोलून दाखविले आहे .