
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कंधार:- अभिलेख विभागात अनेक प्रकारच्या नकला (1)खासरा पत्र (2)1980 च्या पुरावा (3)फेरफार नकल यासारखे पुरावे यासाठी शेतकरी तहसिल मध्ये येतात सबंधीत कर्मचा-यांसोबत विचारपुस करतात तेव्हा त्याना उदया दोन दिवसाला या असे सांगतात. जर आजच कागदपत्र पाहिजे असतील तर दोनसे रुपये दयावे लागतात. झेरॉक्सचे पैसे वेगळे दयावे लागतात व महत्वाचे पुरावे तहशील बाहेर झेरॉक्स साठी घेऊन जातात ते थांबवीने व सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून होत असलेली लुट थांबवावी
तरी मा. साहेबांनी या विभागातील शेतक-यांची होणारी लुट थांबवावी या विभागास झेरॉक्स मशिन उपलब्ध करुन दयावे असे विनंती पत्र जाधव व्यंकटी गोविंद व कंधारे पांडुरंग व्यंकटी यांनी तहसीलदार साहेब कंधार यांना दिले आहे.