
दैनिक चालु वार्ता
मोलगी प्रतिनिधी
रविंद्र पाडवी
नवापुर :- नवापुर तालुक्यातील जास्तीत जास्त अनाथांना सिधापत्रिकेचे वितरण व्हावे यासाठी दिनांक 27/ 12/ 2021 ते 30 /12 /2021 रोजी ठीक सकाळी 10:30 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्यामध्ये प्रचलित नियमानुसार पडताळणी/ तपासणी करून अनाथांना उचित शिधापत्रिका वितरीत करण्यात येणार आहे . त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक राहतील सदर विशेष महिमेचा सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा. यासाठी लागणारी कागदपत्रे घराचा उतारा, शिधापत्रिका नसल्याबाबत घोषणापत्र, जन्माचा दाखला व आधार कार्डची प्रत, 2 अलीकडील काळातील पासपोर्ट फोटो,रहिवासी दाखले ग्रामसेवक/ तलाठी/ नगरसेवक/ घोषणापत्र, भाडेतत्त्वावर राहत असल्यास संबंधित घरमालकाचे प्रतिज्ञापत्र व घराचा उतारा, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक छायांकित प्रत, स्वस्त धान्य दुकानदार यांचा शिधापत्रिका नसल्याबाबत दाखला .विशेष मोहिमेचे ठिकाण दिनांक 27/ 12/ 2021 ठिकाण = देवळफळी दिनांक 28/12 /2021 ठिकाण= महादेव गल्ली दिनांक 29 /12/ 2021 ठिकाण = धड धडया, तिनटेबा, दिनांक 30 12 2021 ठिकाण= लालबारी सदर मोहीम ही मा. जितेंद्र पाडवी प्रभारी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नवापूर यांनी आदेश केले आहे.