
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :-महाराष्ट्रासह देशात भ्रष्टाचार आणि कर चोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आयटी आणि ईडीने केलेल्या कारवाईत अनेक मोठे मासे गळाला लागले आहेत. उत्तर प्रदेशात एका अत्तर व्यवसायकाकडे तब्बल 257 कोटीचा घबाड सापडल्याची घटना ताजी असताना, आता महाराष्ट्रात देखील आयकर विभागाने छापेमारी केली आहे. नाशिकसह धुळे आणि नंदुरबार मध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली आहे याचा छापेमारी कोट्यवधी रुपयांचं घ आयटीच्या हाती लागले आहे.मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाच्या छाप्यात संबंधित तीन जिल्ह्यातून 240 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 6 कोटी च्या रोकड व 5 कोटींचे मौल्यवान दागिने देखील जप्त केले आहेत. उत्तर महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात आयकर विभागाने तब्बल 31 ठिकाणी छापेमारी केली आहे या कारवाईत 240 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे तर व्यापारी पियुष जैनला अटक, 257 कोटीपेक्षा जास्त रक्कम जप्त जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने जप्त केलेल्या कोट्यवधी घबाड मोजण्यासाठी तब्बल बारा तास लागले. सोन्याचे बिस्किट मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे आढळलेली सर्व बेहिशोबी मालमत्ता विभागाने जप्त केली असून संशयित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.