
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
हिमायतनगर:- हिमायतनगर तालुक्यातील दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तीन प्रवाशांचा कोरोना पाॅझिटिव्ह अहवाल जीनोम सिक्वेंन्सींगसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. या तिन रुग्णापैकी दोन रुग्णांचा अहवाल ओमिक्राॅन पाॅझिटिव्ह आल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.प्रशासन सतर्क झाले असुन नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसिकर यांनी केले आहे.मागील पंधरवड्यात विविध देशातुन आलेल्या 302 नागरीकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती.यातील तिन जनांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते.या तिन्ही रुग्णांचा जिनोम सिक्वेंन्सींग साठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत अहवाल पाठविण्यात आला होता.एकंदरीत या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांची व नातेवाईकांची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या.दक्षिण अफ्रिकेतुन आलेल्या या तिन जनांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना सध्या हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात विलिनीकरणात ठेवण्यात आलेले आहे.हे तिन्ही रुग्ण हिमायतनगर तालुक्यातील असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.या तिनपैकी दोघांचा सिक्वेंन्सिंग अहवाल ओमिक्राॅन पाॅझिटिव्ह आल्याने नांदेड जिल्ह्यातही ओमिक्राॅन चा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यातील नागरीकांनी नियम पाळावे व लसिकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसिकर यांनी केले आहे.