
दैनिक चालु वार्ता
कंधार लोहा विशेष प्रतिनिधी (ओंकार लव्हेकर)
आज भल्या पहाटे आमच्या घरात मोबाईलची रिंग वाजायला लागली. मला वाटले आला असेल कोणाचा तरी! पण ,मी थोडा झोपेत असल्यामुळे टंगळमंगळ करत होतो. तसा रविवार म्हणजे थोडा आळसाचा दिवस ,थोड उशीरा उठले तरी चालतं !कामाची दिरंगाई पण पुन्हा रिंग वाजायला लागली. मला वाटले आता उचलावाच लागेल .अन् फोन पाहतो तर काय? माझ्या मावस मेहुणीचा . अन त्या म्हणाल्या काय ?भाऊजी ,अजून झोपेतच आहात काय? उठा सकाळचे साडेसात वाजलेत मुद्दामून फोन केले तुम्हाला ?अहो ,मला वाटले पाच वाजले की काय ?मी थोडा स्वप्नात होतो. पाहतो तर काय अहो चक्क सात वाजून गेले होते. मी थोडा खडबडुन जागा झालो
अन थोडा खुशही झालो. कारण मेहुणीचे फोन अधून मधून फुलपाखरासारखे चालूच असतात .माहेरचा फोन म्हंटलं जरा बायकोही खुश असते. नुसती खुश नसते तर ती लाडातही येते. घर कसं प्रसन्न व आनंदी होते. कारण पत्नी ही घराची लक्ष्मी असते. लक्ष्मीच्या बहिणीचा फोन म्हणजे घरात आनंदाचे वातावरण!
प्रसंगही तसाच होता म्हणा! कारण मेहुणी म्हणत होती. अहो, भाऊजी ऐकलं का आज आमच्या ‘गौरी’ चा साखरपुडा आहे .तुम्ही आणि माझी बहिण तसेच मुले-बाळे तुम्ही सर्वजण मिळून गौरीच्या साखरपुड्याला या! आम्हाला खूप आनंद झाला. कारण काल-पर्वाची गौरी जी आमच्या डोळ्यासमोर जन्मली वाढली .शाळेत गेली, कॉलेजला गेली आणि तिचे लग्न सगळं काही समोर स्वप्नवत वाटत होतं .पण त्यांच्या घरातील मुलगी म्हणजे आमच्या घरातील मुलगी कारण सतत संपर्क सतत जाणे येणे. फोन कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटणे ,बोलणे, हसणे ,काम पडलं तर हक्काने भांडणे सुद्धा पण ह्यासोबत आज या कुटुंबात एक आनंदाचे वातावरण होते .कारण मेहुणीचा फोन म्हणजे आज तो आवाज आणि तो नेहमीच आवाज या जमीन-अस्मानचा फरक होता. कारण त्यांची मुलगी काय अन्आमची मुलगी काय? किती झालं तरी एकच कारण कालांतराने ही माझ्याही मुलीचे लग्न जमणारच आहे .तसा तो फोन ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले! कारण प्रत्येकाच्या मनात जावई कसा असला पाहिजे याचे स्वप्न असते .आपल्या मुलीचं भलं व्हावं मुलीकडचे शांत मुलगा सुस्वभावी विशेषतःतो हसरा चेहरा असणारा असावा .पण हे सारे काही माझ्या डोळ्यासमोर आज घडत होते.
आई-वडील म्हंटले की आपली मुलगी दुसऱ्या घरी देणे ही खरंच काळीज पडणारी गोष्ट आहे .तरी पण ही परंपरा जपावीच लागणार आहे .आपली संस्कृती आहे .कारण दुसऱ्याच्या घरची मुलगीआणून आपल्या घरी नांदणे व आपल्या घरची मुलगी दुसऱ्याच्या घरी नांदणे व दोन्ही घरच्या संस्कृती ह्या वेगवेगळ्या असल्या तरीही दोन्ही घरी खूप आनंद झालेला असतो.
पण आज गौरीच्या ठिकाणी माझ्या मुलीचा मी विचार केला. कारण अशा अनेक गोरी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आज गौरी चा साखरपुडा मी आणि माझी पत्नी त्या ठिकाणी हजर होताच थोडा पाहुणचार झाला .पण वातावरण येवढे आनंदी होते. की सगळे सासरवाडी चे नातेवाईक नवीन कपडे सगळेजण खुश खूप आनंदाचे वातावरण बाजूला संगीता चा सुमधुर आवाज. सतत हसण्याचा आवाज बाहेर जोरदार बँड इतक्यात लाजत मुरडत माझ्यासमोर खूप सुंदर नवरीला साजेल असे कपडे घालून गौरी माझ्या समोर आली . अन् ती म्हणाली काका तुम्ही आलात .मावशी आली की ,नाही ?मी हो ,म्हणालो! अन् ती आपल्या मैत्रिणींसोबत हसत मुरडत लाजत स्टेजकडे निघून गेली .मला वाटले काल-परवा ही आपल्या भावासोबत भांडणे करत होती. तिचे लहानपणीचे हट्ट पाहिले . बाहूलीसाठी हट्ट करणारी गौरी , स्कुटी पाहिजे म्हणून वडिलांना भांडणारी गौरी, माझा लाड का करत नाहीत बाबा! त्याचाच लाड का ?करता. म्हणणारी गौरी आज नवरीच्या रूपात पाहून मला आनंदाश्रू अनावर झाले. कारण तिचा हट्ट जिद्द अभ्यासवृत्ती चिकाटी प्रामाणिकपणा हळवे मन तसेच आई वडिलांना खर्च लागू नये म्हणून थोडेबहुत मनाला आवर घातलेले सगळे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर दिसत होते .तेवढ्यातच तिचा भावी पती अगदी सुटाबुटात एकदम छान पण व्यवसायाने डॉक्टर असणारा तो समोर आला . अन् माझ्या गौरीचे सार्थक झाले .असे मला वाटू लागले .कारण गौरीचे आई-वडील आणि विशेष म्हणजे खूप थकलेले आजोबा अन् आजी
खूप खूष दिसत होते .आजोबाचे वय ऐंशी जरी असले तरी ते एरवी अबोल असणारे आजोबा मात्र सतत बडबडत होते. खूप खुश होते. इतक्यातच स्टेजवरून शाल अंगठी चा कार्यक्रम सुरू झाला आणि पाहतो तर काय गौरीचा नवरा आपल्या भावी पत्नीला त्याने माईक हातात घेऊन गाण्याला सुरुवात केली गाण्याला सुरुवात केली’ पल ,पल ,दील के पास तुम रहती हो’! अन त्याच्या गाण्याने गौरीच्या डोळ्यात जसे जसे गाणे रंगत गेले. तसे गौरीच्या डोळ्यातून अश्रूंची धार सुरु झाली. सगळ्यांनी एकच टाळ्यांचा गजर सुरू झाला .माझ्या मुलीचे सार्थक झाले म्हणून आई वडील हे खुशीने वेडे झाले. अन् तेवढ्यातच डॉक्टर यांनी गौरीचा हात हातात मागितला आणि गौरी पूर्वीच मनाने त्यांची झालेली होती. पण तीने निसंकोच सर्वांसमोर तिनेही त्यांना साद दिली. कारण गौरी ही शिकली सवरलेली सुसंस्कृत आहे .तिला काय हवं !काय नाही ,कुठे काय करावे .हे सगळे समजते पण माझी मुलगी शिकली ती ही डॉक्टर झाली आणि जावई सुद्धा डॉक्टरच मिळाला यापेक्षा अजून जीवनामध्ये काय आनंद हवा !भगवंता ,सुखी ठेव. आशीर्वाद दे !या नवीन जोडप्याच्या भावी आयुष्याला!