
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
गंगाखेड:- ओबीसी आरक्षणासाठी व शासनाने ओबीसी एम्पिरिकल डाटा एक महिन्याच्या आत सादर करावा व ओबीसींचे राजकीय, शैक्षणिक व नौकरीतील आरक्षण रद्द करू नये या प्रमुख मागणीसाठी गंगाखेड येथे आयोजित ओबीसी एल्गार धरणे आंदोलनास जोशी समाज संघटनेने जाहीर पाठिंबा दिल्याचे जोशी समाज संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष दशरथ मोरे यांनी बोलताना सांगितले ,काल सोमवारी गंगाखेड येथे ओबीसी धरणे आंदोलनात परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जोशी समाज संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष दशरथ मोरे यांनी ओबीसी आरक्षण धरणे आंदोलनास जोशी समाजाच्या शिष्टमंडळासह भेट देऊन ओबीसी आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिला, यावेळी जोशी समाज संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष दशरथ मोरे, युवा मल्हार सेना नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा. फुगणर अंतेश्वर, राजू मोरे, बाबुराव मोरे, हनुमंतराव गोकाडै, पिंटू भोळे, नारायण निलेवाड, प्रकाश भोळे, संजय वायफळकर सह जोशी समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.